Media Coverage of Dr. Shailesh Puntambekar and Galaxy Care Hospital

एकाच दिवशी, एकाच ‘ओटी’मध्ये दाेन गर्भाशयांचे प्रत्यारोपण

India's 1st Uterus Transplant Surgery

देशात पहिल्यांदाच गुजरातमधील डॉक्टरांनी रविवारी एकाच दिवशी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भाशयांचे दोन प्रत्यारोपण यशस्वी करून दोन लेकींच्या (वय २२ आणि २८) आई बनण्याच्या मार्गातील अडथळा दूर केला. आता या दोन्ही लेकींना गर्भधारणा होऊन मातृत्वाचे सुख मिळेल. मोठी गोष्ट अशी की या दोन्ही लेकींना त्यांच्या मातांनी गर्भाशय दान केले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास दैवी चमत्कार आणि विज्ञानाचा मेळ असा की ज्या गर्भाशयातून लेकींचा जन्म झाला, त्यातूनच त्यांना मातृत्वाचे सुख मिळेल. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण झाले. या यशावर अहमदाबादेतील सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरातील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटरचे (आयकेडीआरसी) नाव कोरले गेले. डॉ. विनीत मिश्रा आणि पुण्याचे सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे डॉक्टरांच्या पथकाला आवश्यक सूचना देत होते.

Source : https://divyamarathi.bhaskar.com/national/news/on-the-same-day-in-the-same-ot-both-wombs-were-transplanted-mothers-became-donors-hindu-muslim-women-were-unable-to-conceive-130363566.html

About Dr. Shailesh Puntambekar